Presidential Desk 2017

    श्री. मयूर अकोलेअध्यक्ष,
    मराठी मंडळ दक्षिण आफ्रिका.

    मराठी मंडळाच्या सर्व वाचकांना, हितचिंताकांना मयूर अकोले चा आदरपूर्वक नमस्कार.
    मराठी मंडळ हे स्थापन झाले ते २००९ मध्ये. आपल्यातल्याच काही मंडळींनी म्हणजे – श्री. परिक्षीत मुसळे, श्री. स्वप्निल यमडे, श्री. प्रशांत सिद्दापूर, श्री. नितीन नाळगीलकर, श्री.राजीव तेरवाडकर, श्री. आदित्य काळे व सौ. माधवी राजगुरे यांच्या पुढाकाराने.
    गेल्या ७ वर्षात महाराष्ट्राची संस्कृती, चाली रीती, परंपरा इथे दक्षिण आफ्रिके मधे आम्ही जोपासली आणि वाढवली. एखाद्या कामाला सुरवात करणे खूप सोपे असते. सुरवातीला खूप उत्साह असतो, हौस असते, नाविण्याची किंवा नवीन काही तरी करण्याची जिद्द असते, परंतु जसे जसे दिवस जाउलागतात आणि तेच ते काम सतत चालू ठेवणे जितके महत्वाचे असते तितके से सोपे नसते. त्यातच नवीन काहीतरी करून लोकांना मराठी मांडला विषयी ओढ लावणे तीत्ताकेच म्हन्त्वाचेअसते.

    पण इथे मला सांगावायास अभिमान वाटतो की गेल्या ७ वर्षात आपले हे मराठी मंडळ दिमखणे वाटचाल करत आहे, दर वर्षी नवीन काही तरी देण्याचा प्रयत्न करत आहे. याचे श्रेय जाते तेया संस्थपाकाना, आता पर्यंतच्या सर्व अध्यक्षाना, कार्यकारणीच्या सदस्याना, आपल्या स्वयंसेवकाना आणि आपणा सर्वाना. या सर्वाना मनाचा मुजरा करून मी या वार्षीच्या अध्यक्षपदाचीसूत्रे हाती घेतली.

    मी तसे पहिले तर जळगाव चा. पण वडील सारकारी नोकरीत असल्यामुळे बदली ही ठरलेलीच. सुरवातीला वाटायचे आपण आताच तर आलो, आतच तर आपले हे मित्रा झाले, लगेच कसेआपल्या मित्रणा सोडून, आपल्या शिक्षकणा सोडून जायचे. मग हळूहळू वडिलनी समजूत घातली नवीन मार्ग दाखवला, नवीन मित्रा बनवण्याचा, नवीन गोष्टी, नवीन संस्कृती शिकण्याचीआणि त्याबरोबर ज्ञानात भर पाडण्याची शिकवण त्यानी दिली. नवीन नवीन मित्रा मिळत गेले, नवीन नवीन संस्था च्या संपर्कात आल्याने विचार बदलत गेले पण हे सर्वा होत असतानाआजी आजोबांच्या सहवासात, आई वडिलांच्या संस्कारांन मुळे मराठी शी, मराठी संस्कृतीशी कायमची नाळ बांधली गेली. SOS, Rotary Club, Y.H.A.I आशा अनेक स्वयंसेवीसंस्थांच्या संपर्कात आल्याने, तेथील विविध प्रवृत्तीच्या व्यक्तींन सोबत काम करतांना कळले की जितके व्यक्ती तितक्या प्रवृती, अनेक व्यक्तिरेखा एकत्र येतात तेव्हा त्यांचे ध्येय एक असूशकते पण विचार, काम करण्याची पद्धत वेगवेगळे असू शकते, परंतु त्याचा सर्वांगाने, सर्व गोष्टींचा विचार करून एक मेकान ची साथ देऊन एकत्र काम करणे नि आपले ध्येय गाठने खूपमहत्वाचे असते.

    गेल्या काही वर्षात, मराठी मंडळाचा सदस्य होऊन वेग वेगळे काम करताना अनेक अनुभव आलेत, बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि महत्वाचे म्हणजे आयुष्यभरचे सवंगडी मिळाले.यातच मराठी मंडळाच्या सदस्यणी माझयावर यावर्षी अध्यक्ष पदाची महत्वाची जावबदारी सांभाळण्यासाठी जो विश्वास दाखवला आणि जे सहकार्या केले त्याबद्दल या सर्वा मंडळींचे, आजीवा माजी आध्यक्षांचे मन्पुर्वक आभार.

    बदलत्या काळानुसार, नवीन विचारांना प्रेरणा देऊन मराठी मंडळ ज्यांच्या पर्यंत पोहोचले नाही, त्यांच्या पर्यंत कसे पोहोचवता येईल, जे मंडळाचे सदसया आहे त्यांची मराठी मंडळाबद्दलआत्मियता कशी वाढवता येईल, वेगवेगळ्या मंडळातील संवाद वाढवून एकमेकांना सहकार्य कसे करता येईल,जास्तीत जास्त मराठी भाषिकांना एकत्र कसे आणता येईल यासाठी आमचीकार्या करणी प्रयत्न करते आहे.

    दर वर्षी आम्ही इंडिया क्लब संस्थानाच्या भारताच्या स्वातंत्रा दिवसाच्या उत्सवात महाराष्ट्राच्या विविध झाकी दाखवण्यात मोलाचा वाटा उचलतो. मकर संक्रांत ते कोजागिरी ह्या सर्वामराठी सणांना साता समुद्रा पलीकडे दिमखणे उत्साहाने साजरे करतो.

    गेल्या वर्षात, असेच सर्व कार्यक्रम साजरे करून, काही महत्वाच्या प्रक्रिया स्थित करण्यात आल्या आणि काही निर्णय घेण्यात आले, याच बरोबर मराठी मंडळाचे नवीन संकेतस्थळ www.mmsa.org.za, आदरणीय तोमर श्री रणधीर जैसवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

    या वर्षा आमच्या कार्या कारणीत श्री राजीव तेरवाडकर, श्री प्रशांत सिद्दापूर, सौ. प्रिया भागवत, श्री संतोष गिरंजे, श्री सचिन सुर्वे, श्री महेश कलकोंडा, श्री निलेंद्र परदेशी यांचासमावेश आहे.

    दर वर्षी प्रमाणे या वर्षी करिता ही काही महत्वाची उद्दिष्टे आम्ही ठरवली आहे, ती उद्दिष्टे सफल करण्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्या व लोभ मिळेल यात शंका नाही.

    आपला काहीही सूचना असतील, काही विचार असतील तर या कार्यकारणी ला जरूर कळवावे.


    आपला कृपाभिलाषी,

    श्री. मयूर अकोले अध्यक्ष, मराठी मंडळ दक्षिण आफ्रिका